Published On : Mon, Dec 30th, 2019

होऊ शकते ची लहर बनवा : डॉ मेधनकर

Advertisement

– बसपा नेत्यांचे नागपुरात भव्य स्वागत डॉ मेधनकर व ऍड ताजने दीक्षाभूमीवर

नागपुर : बसपा नेते कांशीरामजी ह्यांनी पक्षाला राष्ट्रीय बनविले, बहन मायावतीजींनी भारतातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशात 4 वेळा सरकार बनविली, त्याच विश्वासाने महाराष्ट्र मध्ये बसपाची लहर बनवा असे आवाहन बसपा चे नवनिर्वाचित *महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ लालजी मेधनकर ह्यांनी केले.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ मेधनकर हे पेरियार स्मृती दिन निमित्त आज बसपा कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांचे सोबत प्रामुख्याने बसपा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजने होते.

डॉ मेधनकर ह्यांनी यावेळी बहुजन समाजातील सर्व जातींना जोडून, त्यांच्यात बंधुभाव निर्माण करुन त्यांना शासक बनविण्यासाठी मिशनरी कार्यकर्त्यांनी कार्य करावे असेही डॉ लालजी मेधनकर ह्यांनी वक्तव्य केले.

बहनजींचा आदेश मानणारेच बसपाचे खरे कार्यकर्ते असून त्यांनी दिलेल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणे व बहनजींनी दिलेले आर्थिक सहयोग व संगठण बांधणीचे आदेश पूर्ण करणे ही बसपा च्या कार्यकर्त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत *महाराष्ट्र प्रदेश बसपा चे अध्यक्ष ऍड संदीपजी ताजने ह्यांनी व्यक्त केले।
बहनजी द्वारे बसपा नेत्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा हा नागपुरातील प्रथमच सदीच्च दौरा होता, यावेळी त्यांनी संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व त्यानंतर बसपा नेत्यांनी दीक्षाभूमी वरील बाबासाहेबांच्या स्मारकाला प्रमुखय्याने भेट दिली.

या प्रसंगी बसपा नेत्यांनी नारी रोडवरील प्रदेश बसपा कार्यालयात नागपुरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नागपूर जिल्हा प्रभारी नागोराव जयकर ह्यांनी तर समारोप जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम ह्यांनी केला.

यावेळी त्यांचे सोबत प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे, अविनाश वानखेडे, उत्तम शेवडे, भाऊ गोंडाने, जितेंद्र घोडेस्वार, मोहन राईकवार, अभिजीत मनवर, जागेश बांगर, कृष्णा गजभिये, नितीन शिंगाडे आदी प्रमुख पदाधिकार्या सहित आजी-माजी नगरसेवक, व शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement