– पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, राज्यात ‘युवा चेतना दिन’ उत्साहात साजरा
नागपूर: ‘वंचित’ या नावावर राजकारण करणाÚयांना खÚया अर्थाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजलेच नाहीत. दिशाभूल करणाÚया अशा राजकारणार्यांना अद्दल घडवली पाहिजे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. गुरूवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात भाई जयदीप कवाडे यांचा वाढदिवस युवा चेतना दिन म्हणून साजरा करण्यात आले. भव्य सत्कार सोहळयात लाॅंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राश्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते भाई जयदीप कवाडे यांना षाॅल व पुश्पहार देउन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी ताराचंद खांडेकर, ई.मो.नारनवरे, सौ.रंजना कवाडे, सौ. प्रतिमा ज. कवाडे, अरुण गजभिये, बालू मामा कोसमकर, नरेंद्र डोंगरे, भगवानदास भोजवानी, अजय चव्हाण, कैलास बोंबले, संजय खांडेकर, गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम, सौ. प्रतिमा ज. कवाडे, कपिल लिंगायत, भूषण मार्लिवार,अभिलाष बोरकर,निशांत तभाने,महेश बाबू,स्वपनिल महल्ले, राहुल देशब्रतार,नीरज पराड़कर, दरायस संजना, कुशल ठाकुर,शैलेश उमप निखिलेश तभाने,राहुल पांडे, संदीप चोखांदरे, अक्षय नानवतकर, सविताताई नारनवरे, पूनम मटके, शीतल खान, अॅड. अरुण महाकाळे, विपीन गाडगीलवार, तुषार चिकाटे, रोशन तेलरांधे, पियुष हलमारे, सुरेश बोंदाडे, गौतम थुलकर, कुशीनारा सोमकुवर, वसीम खान, प्रज्योत कांबळे तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, 14 ऑक्टोबर 1956 पूर्वी सर्व समाजबांधव समाजव्यवस्थेत वंचित होता. पंरतु, ऐतिहासिक धर्मांतरण सोहळ्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक दशकांपासून दुर्लक्षीत असंख्य कुळांना बौद्ध धर्माची दिक्षा दिल्याने आता कुणीही ‘वंचित’ राहिलेले नाही. केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रेम असणार्यांकडून ‘सुपारी’ घेवून समाजाला ‘वंचित’ बनवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप जयदीप कवाडे यांनी केला.
‘रिपब्लिकन’ एकमेव राजकीय पर्याय
‘रिपब्लिकन’ हा एकमेव राजकीय पर्याय डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. रिपब्लिक लोकांना शासनकर्ती जमात बनवण्याची आता हिच ती वेळ आहे, असे कवाडे यावेळी म्हणाले. आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीमध्ये समाजाच्या उध्दारासाठी पाच पिढ्यांपासून कवाडे कुटुंबिय समर्पित आहे. हे सर्व करीत असताना इतर राजकीय रंग, चळवळ बघितली. पंरतु, खÚया अर्थाने बाबासाहेबांची रिपब्लिकन ही संकल्पना साकार करण्याचे कार्य पीपल्स रिपब्लिकन पार्टी करीत असल्याचे प्रतीपादन त्यांनी यानिमित्त केले. देशातील आणि राज्यातील युवकांना पक्षात मोठ्या प्रमाणात नेतृत्व देण्यात येणार आहे. पार्टीच्या विस्तार करण्यासाठी तरूण कार्यकत्र्यांवर मोठी जबाबदारी येत्या काळात देण्यात येणार असल्याचे जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. कार्यकत्र्यांकडून मिळालेले प्रेम हाच खरा सत्कार असल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम
वाढदिवसानिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड,दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाय सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने अनेक कार्यकत्र्यांनी रक्तदान केले.