Advertisement
नागपूर: लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी विजयी झाले आहेत. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करत ढोल ताशांचा गजरात जल्लोष साजरा केला.भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हाती गडकरी यांना पंतप्रधान करा, अशा आशयाचे फलक होते. त्यावर ‘ देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हो ही देवाकडे प्रार्थना’ असे लिहिले होते.
त्यामुळे यंदा गडकरी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.कार्यकर्त्यांच्या जल्लोषात खुद्द गडकरी सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मिठाई भरवल्याचे पाहायला मिळाले.नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत केले.