Published On : Wed, Jan 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांची बिटकॉईनच्या नावाने फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगारास अटक !

Advertisement

नागपूर : नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीने बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा. मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, माईक लुसी याने काही वर्षांअगोदर ‘फ्युचर बिट कंपनी’ स्थापन केली. त्यानंतर त्याने पंचतारांकित हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करून उपस्थितांना बिट क्वाईन बाबत माहिती दिली. जर कंपनीच्या माध्यमातून बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली तर तीन महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल असा दावा त्याने केला होता. या आमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. २०१७ साली माईकने साईट बंद केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदरांमध्ये धाकधूक वाढली. त्यानंतर ३८ लाख गमावलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून नागपुरात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फसवणूक प्रकरणी पोलिसांनी निषेध वासनिक, अभिजीत शिरगीरवार, गोंदियातील कृष्णा भांडारकर, शामी जैस्वाल यांना अटक केली होती. तर माईकविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. माईक देशातून पळ काढणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांना कळाली. दिल्ली विमानतळावरून हवाई मार्गाने तो बाहेर देशात जाण्याच्या तयारीत होता. नागपूर पोलिसांच्या पथकाने दिल्ली विमानतळावरून पोहोचून माईकला अटक केली. आरोपीला नागपुरात आणण्यात आले व त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement