Published On : Fri, Jun 22nd, 2018

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती

Advertisement

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आजच लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

यापूर्वी मोहन प्रकाश यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं प्रभारीपद होतं. मात्र लोकसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला असताना ही जबाबदारी खर्गे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Gold Rate
Thursday 20 March 2025
Gold 24 KT 89,200 /-
Gold 22 KT 83,000 /-
Silver / Kg 100,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर राष्ट्रीय पातळीवरही फेरबदल करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी जे. डी. सिलम आणि महेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहसचिवपदाची जबाबदारी शशिकांत शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, ओदिशा आणि मिझोरमसाठी स्क्रिनिंग कमिटीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि मिझोरमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. तर ओडिसा मध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक संपन्न होणार आहे.

Advertisement
Advertisement