नागपूर : नागपुरात मांस विक्रेत्याला जमावाने केलेल्या मारहाण प्रकरणी चौघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आली आहे. भारसिंगी गावात सलीम इस्माईल शाह या मांस विक्रेत्याला गोमांस घेऊन चाललाय या संशयातून तथाकथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली.
मोरेश्वर तांडुलकर, जगदिश चौधरी, अश्विन उईके आणि रामेश्वर तायवाडे अशी या चार जणांची नावं आहेत, ज्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
गोरक्षणाच्या नावावर हिंसा करु नये, असं खुद्द पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरही गोरक्षकांची ही गुंडगिरी काही थांबत नाही. सलीम हा काल त्याच्या दुचाकीवरुन डिक्कीत मांस घेऊन चालला होता. त्यावेळी अचानक समोरुन आलेल्या जमावाने त्याला थांबवलं आणि मारहाणीला सुरुवात केली.
गर्दीतल्या अनेकांनी त्याला ओढत रस्त्यावर फेकलं आणि लाथा बुक्क्यांनी मारण्यात आलं. हे गोमांस नाही असं वारंवार सांगूनही त्याचं कोणीच ऐकलं नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची सुटका केली.
#WATCH: Man beaten up for allegedly carrying beef in Nagpur’s Bharsingi, no arrests have been made yet. #Maharashtra (July 12th) pic.twitter.com/JiFAZMfRSS
— ANI (@ANI_news) July 13, 2017