नागपूर : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी झाडांना वाचवणे आणि वाढवणे किती गरजेचे आहे, हे सर्वांनाच माहित आहे. कारण वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत आहे आणि असेच जर होत राहिले तर निसर्गाच्या प्रकोपापासून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना धोका आहे.
तसेच जर आपण वेळीच जास्तीत जास्त झाडे नाही लावली तर भविष्यात ऑक्सिजनची पन कामतरता भासू शकते. हे पाहता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मांगल्य संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासूनच वृक्षारोपणाची सुरुवात झाली.
मटकाझरी, मनिषनगर,शांतिछाया सोसायटी, सोमलवाडा , साकेतनगर मौसमकॉलनी, शंकरपूर , जयदुर्गालेआउट ,दुर्गा मंदिर, वेडाहरी आणि रोड च्या कडेला वृक्ष लावून निसर्गप्रेमी लोकांना झाडांना पानी टाकून त्याचे सांगोपन करण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करावे याउद्देशाने संस्थेकडून आकर्षक पुरस्कारही देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष चैताली भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली वीणा वैद्य, सीमा पटले ,श्रुती देशपांडे भावना भोयर , अंकिता पवार , सचिन भस्मे, राजेंद्र भय्या ,रोशन इंगळे ,आदी संस्थे च्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले वृक्षांचे संगोपन करून त्यांना रोज पाणी टाकून वाढवण्याची जबाबदारी शेखर गुल्हणे, अनंत शेंद्रे, विनोद किनेकर, आत्माराम बोकडे,मिलिंद देशपांडे ,शैलेंद्र बोरकर या नागरिकांनी स्वीकारली.