मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जाहीरनाम्याची घोषणा केली.
कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसेच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले. मात्र अद्यापही महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपाचा फार्म्युला ठरला नाही. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचे या जाहीनाम्यात म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.
जाहीरनाम्यातील घोषणा –
-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार
– यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा याकरता शिफारस करणार
– शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थित असली पाहिजे
-आपरंपरिक वीजनिर्मिती करणार. खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर पर्यावरणाचे संकट थोपवायचं असेल तर
-वीजनिर्मिती युनिट, उद्योगांना प्राधान्य,-कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ,
-जातनिहाय जनगणनेचा प्रश्नमार्गी लावणार,
-उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा,
– संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे याकरता पाठिंबा