Published On : Wed, Jan 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

मनीषा मोहोड यांना पीएच.डी. प्रदान

नागपूर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे मनीषा सुभाष मोहोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी ‘मुद्रित माध्यमातील व्यावसायीकरण आणि वृत्तपत्रांच्या बदलत्या भूमिका : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर आणि जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. उज्वला भिरूड नेहेते यांनी मार्गदर्शन केले.

Gold Rate
Friday 28 Feb. 2025
Gold 24 KT 85,400 /-
Gold 22 KT 79,400 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सौ. मनीषा मोहोड या बारा वर्षे मुद्रीत माध्यम तसेच डिजिटल मिडीयात कार्यरत आहेत. सौ. मनीषा नागपूर येथील ॲड. अल्केश यादवराव येरखेडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबासह पीएचडी मार्गदर्शक आणि सहकारी मिञपरिवाराला दिले.

Advertisement