नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल नऊ दिवस उपोषण केले होते. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला. जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथेली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आज या दौऱ्याची पाटील यांनी घोषणा केली आहे. पाटील यांचा दौरा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे. १५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. १६ रोजी दौड, मायणी. १७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. १८ रोजी सातारा, मेंढा, वाईस रायगड. १९ रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी. २० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर. २२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. २३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव. हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे.अशाच प्रकारे आम्ही सहा टप्प्यात दौरा करणार आहोत. इतकेच नाही तर १ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करणार आहोत. आम्ही हा महाराष्ट्र दौरा स्वखर्चाने करणार असून कुणीही आम्हाला पैसे देऊ नये, असेही पाटील म्हणाले.