Published On : Fri, Nov 10th, 2023

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचे मोठं नुकसान होणार; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

Advertisement

मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला.

पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला असून दुसरीकडे आता ओबीसी आरक्षणावरुन ओबीसी नेत्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटवार यांनीही विरोध केला असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचे मोठं नुकसान होणार आहे. ओबीसीत ३७२ जाती आहे, यात येऊन फायदा होणार नाही. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सर्व काही ठरवू नये, अभ्यास करुन तरुणांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन वड्डेटीवार यांनी केले.

तरुणांना नोकऱ्यांचा आणि सोयी, सवलती यांचा संदर्भ येतो तिथे मोठे नुकसान होणार आहे.अशा परिस्थीतीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं काय आहे याचा विचार करावा, असा सल्लाही वड्डेटीवार यांनी दिला.