मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाई
नागपूर : जमिनीवर अवैध कब्जा करून बांधकाम करण्यात आलेला साहिल सैय्यदच्या तीन मजली बंगल्यावर बुधवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागाने बुलडोजर चालविला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार चोख पोलिस बंदोबस्तात सदर बंगला जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरू आहे. तीन जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यातआली.
मंगळवारी झोन अंतर्गत झिंगाबाई टाकळी येथील बाबा फरीद नगर जवळील बगदादीया कॉलनी येथे साहिल सैय्यद खुर्शीद सैय्यद यांचेद्वार सर्व्हे नं. ८८,भूखंड क्र.२४४, २४५ वर अवैध कब्जा करून सुमारे ५०० वर्ग मीटर जागेत बांधकाम करण्यात आले होते. यासंबंधी गांभीर्याने दखल मनपा आयुक्तांनी सदर बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, उपअभियंता कमलेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी, राजेश वानखेडे, सहाय्यक अधीक्षक (अतिक्रमण) संजय कांबळे यांच्याद्वारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्त गुन्हा शाखा राजमाने, मानकापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक ठाकरे यांनी सहकार्य केले.
मंगळवारी झोन अंतर्गत झिंगाबाई टाकळी येथील बगदादीया कॉलनी येथे साहिल सैय्यद यांचे हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याने मनपाच्या मंगळवारी झोनतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमचे कलम ५३ अंतर्गत अनधिकृत बांधकाम २४ तासात पाडण्यासाठी १० ऑगस्ट ला नोटीस तामिल करण्यात आली होती. ११ ऑगस्ट रोजी २४ तासाची कालावधी संपल्यावरही सदर मालमत्ता धारकांनी बांधकाम पाडण्याबाबत कुठलेही कारवाई न केल्याने मनपातर्फे सदर बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. कारवाई साठी मनपाचे पथक पोहताच सदर मालमत्ता धारकांच्या कुंटुंबींनी नागरिकांना जमा करुन कारवाईचा विरोध केला परंतु मानकापुर पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरु करण्यात आली. कारवाई थांबणार नाही हे लक्षात आल्यावर कुंटुंबींयानी घरातील सामान काढण्याची सुरुवात केली.
एकुण २८८ भूखंडाच्या अभिन्यास सतरंजीपुरा बडी मज्जीद संस्थाची १६ एकर जागेवर तयार करण्यात आला असून या अभिन्यास धारकाने महानगरपालिका, नासुप्र यांची कुठलेही परवानगी घेतली नाही व भूखंड लोकांना विकण्यासाठी साध्या कागदावर करारनामा करुन भूखंडाची किंमत वसुल केल्याचेही निर्देशास आले आहे.साहिल सैय्यद यांनीपण जागा हडपुण अलिशान बंगला बांधला आहे. या ले-आऊट मधील सर्वच बांधकाम अनधिकृत असून त्यांना सुध्दा नोटीस तामिल करुन कारवाई करण्यात येणार आहे.
.
ही कारवाई पूर्ण करण्यासाठी मनपाचे सहाय्यक स्थापत्य अभियंता दिपक जांभुळकर, पी.के.गिरी, महेंद्र जनबंधु, प्रशांत सोनकुसरे, अतिक्रमण विभागाचे सुनील बावणे, बी.बी.माळवे, सुरेश डहाके यांच्यासह मंगळवारी झोनचे अतिक्रमण पथक, उपद्रव शोध पथकाचे सहकार्य मिळाले.