नागपूर : महिन्द्रा फार्म डिवीजन नागपूर यूनिट तर्फे महिन्द्रा सी.एस.आर. उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेला सॅनीटाइजर स्टॅण्ड आणि सॅनीटाइजर बाटल/कॅन भेट करण्यात आले. महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या वतीने ही भेट स्वीकारली.
महापौरांनी महिन्द्राच्या प्रतिनिधींसोबत ७५ वंदे मातरम हेल्थ पोस्ट व मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट व एन.डी.एस.च्या तयारी संबंधात चर्चा केली. स्वतंत्रत्याचा ७५ व्या वर्धापन दिवशी च्या निमित्त साधून महापौरांनी वंदे मातरम हेल्थ पोस्ट ची योजना तयार केली आहे. या योजनेला मनपा प्रशासनाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योजनेचा खाजगी कोचिंग इंस्टीटयूट कडून सहकार्य मिळत आहे. महापौरांनी नदीचा काठावर वन औषधी ची लागवण करण्याबददल चर्चा केली. अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, हॅण्ड सॅनीटाइजर स्टॅण्ड महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयामध्ये, विभागांमध्ये व अन्य ठिकाणी ठेवण्यात येईल.
यावेळी सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्री. राजेन्द्र सोनकुसरे, नगरसेवक श्री. निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, महिन्द्रा तर्फे प्लांट प्रमुख श्री. श्रीकांत दुबे, डी.जी.एम. श्री. अभिजीत कलंबे, विभाग प्रमुख श्री. नितीन पगार, व्यवस्थापक श्री. विजय चंद्रा व श्रीमती योगिनी सोमन आदी उपस्थित होते.