नागपूर : लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या अनुषंगाने फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात झाली असून काँग्रेचे बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपानेही त्यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर काँग्रेचे आणखी काही आमदार भाजपात जाणार असा दावा सत्ताधारी नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला.
भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ. जेव्हा हातोडा मारू तेव्हा जागा दिसेल. आता त्यांना आमचे जितके नेते घेऊन जायचे आहे. घेऊन जाऊ द्या, असे पटोले म्हणाले. पटोले यांच्या या विधानाने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
दरम्यान अशोक चव्हाण यांच्या रुपात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.चव्हाण यांचे समर्थकही लवकरच भाजपचा झेंडा हाती घेतील,असा दावा भाजपाकडून केला जातो.