नागपूर :आंतरराष्ट्रीय योग दिनाच्यानिमत्ताने नागपुरात यशवंत स्टेडियममध्ये योगदीन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे.आम्हाला अभिमान आहे की युनोने याबाबत निर्णय घेतला. आज १८० देशांत हा कार्यक्रम होतो आहे. आज पंतप्रधान मोदी युनोच्या कार्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. योग एक विज्ञान आहे. रोज योग केल्याने आरोग्य चांगले राहते. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात योग करतो, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी महापालिका, आरोग्य विभाग, शाळा, आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाविद्यालय, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्थांशी संबंधित अधिकारी कर्मचारी व योग संस्थांचे योग साधक सहभागी झाले होते. तसेच योगतज्ञ रामभाऊ खांडवे, प्रवीण दटके उपस्थित होते.