मी, संजय राऊतांसारखा रिकामटेकडा नाही; देवेंद्र फडणवीसांचे प्रतिउत्तर
नागपूर :भाजपने फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण केले. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला, अनेकांना जेलमध्ये टाकले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात बोलताना केली. यावेळी राऊत यांनी अप्रत्यपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मैत्री तोडल्याचा आरोप केला. यासंदर्भात...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका; वाल्मिक कराडला दिलासा
मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले होते आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम...
मेयो’ व ‘मेडिकल’ मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती द्या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे रुग्णांची संख्या व रुग्णालयाप्रती विश्वासार्हता अधिक आहे. येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे...
मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार; संजय राऊतांची घोषणा
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला तर महाविकास आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती...
केस गळती प्रकरण;११ गावातील टक्कल बाधितांची संख्या १०० हून अधिक,स्थानिकांमध्ये दहशत !
बुलढाणा - बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातीलपूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तीन दिवसातच अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुरुवारच्या प्राप्त अहवालानुसार, अकरा गावात १०० हून अधिक टक्कल...
नागपुरात खंडणीस नकार दिल्याने गुन्हेगाराचा दुकान मालकावर धारदार शस्त्रांनी हल्ला; दोघे जखमी
नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराने नाश्त्याच्या दुकानाच्या मालकाकडून खंडणी मागितली. मात्र पैसे देण्यास दुकान मालकाने नकार दिल्याने गुन्हेगाराने त्याच्यावर चाकूने वार केले. तथापि, जेव्हा शेजारी त्याला वाचवण्यासाठी धावला तेव्हा त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांचा...
आपली बसच्या वाहकांना मिळणार किमान वेतन कायद्यानुसार पगार
नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ परिवहन सेवेतील वाहकांचे वेतन आता किमान वेतन कायद्यानुसार होणार आहेत. यासंदर्भात नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेच्या मागणीनुसार किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी...
नागपूर पोलिसांनी कसली कंबर; नायलॉन मांजावर लक्ष ठेवण्यासाठी करणार ड्रोनचा वापर !
नागपूर : पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नागपूर पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. नायलॉन मांजावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले की, येत्या दिवसांत ड्रोन कॅमेरे पतंग उडवणाऱ्या किंवा...
नागपुरातील सिल्व्हर नेस्ट हॉटेलमध्ये एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या!
नागपूर: शहरातील घाट रोडवरील सिल्व्हर नेस्ट हॉटेलमध्ये आज शुक्रवारी एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीचे नाव तेजस संतोष गायकवाड असे आहे, तो शताब्दी चौकातील रहिवासी होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस गेल्या अनेक दिवसांपासून...
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली
नवी दिल्ली :समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या आहेत. समलैंगिक विवाहाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी महत्त्वपूर्ण निकाल सुनावला होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक...
पर्यटकांकडून वाघांची अडवणूक हे वनविभागाचे अपयश; उच्च न्यायालयाने फटकारले
नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पर्यटनाच्या नावावर अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
परळीत मतदान केंद्रावर बटण दाबण्याचे काम ही गँग करायची;व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी नेत्यांनी पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे...
महायुती सरकार ‘लाडकी बहीण योजने’चे आश्वासन कसे पूर्ण करणार? सत्ता स्थापनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित!
नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात महिलांसाठीच्या 'लाडकी बहीण योजने'ने मोठी भूमिका बजावली. प्रत्येक निवडणूक मोहीम याचभोवती फिरत असे. महायुती सरकार स्थापन होऊन जवळजवळ एक महिना उलटला, अशा परिस्थितीत, या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी पोहोचतील, असा...
नागपुरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या;आरोपी पतीला अटक
नागपूर: शहरातील हुडकेश्वर परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी आरोपीने हत्या नाही तर हा अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा...
ईडीने तेव्हा वाल्मिक कराडविरोधात कारवाई का केली नाही? सुप्रिया सुळे आक्रमक
बीड: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. कराडवर आधीच...
नितीन गडकरींची मोठी घोषणा; रस्ते अपघातग्रस्त जखमींना आता मिळणार कॅशलेस उपचार !
नागपूर : देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली आहे. हे पाहता परिस्थितीत केंद्र सरकारने जखमी झालेले नागरिक आणि मृत्यू झालेल्या नागरिकांच्या जवळच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मोठी घोषणा करत अपघातग्रस्तांसाठी ‘कॅशलेस...
नागपुरात वाहतूक विभागाची मॉडीफाईड सायलेन्सर विरूद्ध विशेष मोहीम !
नागपूर : शहरात मॉडीफाईड सायलेन्सर लावून दुचाकी वाहन चालविण्याने त्याच्या होणाऱ्या कर्नकर्कश आवाजामुळे जेष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे नागपुर शहर वाहतूक विभागात या संदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीरता लक्षात घेता वाहतूक विभागाकडून...
वनमंत्री गणेश नाईक यांनी गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला दिली भेट
नागपूर: या आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमधील गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात एव्हियन इन्फ्लूएंझामुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूरला पोहोचून केंद्राची पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद...
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत बसविण्यात येणार सीसीटीव्ही यंत्रणा
नागपूर : येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या दहावी तसेच...
उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला दणका; राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची याचिका फेटाळली
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी...
नागपुरात तोतया पोलिसांची दहशत; अजनी पोलीस स्टेशनसमोर दाम्पत्याला लुटले
नागपूर : शहरात तोतया पोलिसांचे थैमान सुरु झाले असून यांच्याकडून नागरिकांना लुटले जात आहे. नुकतीच अशाच प्रकारची घटना अजनी पोलीस स्टेशनसमोर घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी पोलिसांचा पोशाख धारण केला होता. आपण पोलीस असल्याचे भासवत त्या दोघांनी...