Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन क्र.१० येथे बाजार विभागातील बाजार निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मिलींद मेश्राम हे ३१ वर्षाची सेवा पूर्ण करून गुरूवार (दि.३१) रोजी निवृत्त झाले आहे.
त्यांनी म.न.पा.च्या विविध विभागात प्रामाणिकपणे कामे सांभाळून आपली सेवा मनपामध्ये दिली. त्यांच्या कामाची पावती म्हणून मनपा उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे, उपायुक्त श्री. अशोक पाटील. उपायुक्त श्री. विजय हुमने यांनी त्यांचे शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला.
या सत्कार सोहळयात कर निर्धारक श्री. दिनकर उमरेडकर, बाजार अधिक्षक प्रमोद वानखेडे, श्रीकांत वैद्य, संजय बडे, निलेश वाघुळकर, दिलीप जबलपूरे, स्मिता जांभूळकर, दिपक जांभुळकर यांनी पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवून त्यांचे स्वागत केले.