Advertisement
नागपूर : जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्री जी ब्लॉक कंपनीतभीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 6 ते 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा स्फोट नेमका कसा घडला याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.