कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील 100 खाटांचे सुसज्ज असलेले शासकोय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार नुकताच उघडकीस आला असून प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती मातेच्या नातेवाईकांकडून आर्थिक लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला असता याप्रकारावर प्रतिबंध लागावा तसेच नेहमी चर्चेच्या वादात अडकलेले महिला वैद्यकीय अधीकारी डॉ शीतल गजघाटे यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरून आमदार टेकचंद सावरकर यांच्या मुख्य उपस्थितीत नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवला असता यावर 15 दिवसाच्या आत कारवाही करण्याचे आश्वासन आमदार टेकचंद सावरकर यांनी दिले होते
मात्र आज महिना संपण्याच्या मार्गावर आले असतानाही रुग्णालयात कुठलाही बदल दिसून येत नसून प्रशासनाचा मनमानी कारभार अजूनही कायम आहे यावरून आमदार टेकचंद सावरकरांचा आरोग्य प्रशासनावर कुठलाही वचक नसल्याचे दिसून येत असून दिलेले आश्वासनहे पूर्णता फोल ठरले यावरून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’असा प्रकार निदर्शनास आल्याने येथील जागरूक संघटनांनी या न्यायिक लढ्याला थांबा न देता आंदोलनाचा पवित्रा घेतला व आज 28 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता पीपल्स रिपब्लिकन पार्टी , वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया , राष्ट्रीय मजदूर सेना , व कामठी महिला संघ कामठी च्या संयुक्त पुढकारातून शासकोय उपजिल्हा रुग्णालय कामठी च्या विरोधात भव्य नारे निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले होते.
या आंदोलनातून स्त्री रोग विशेषज्ञ डॉ शीतल गजघाटे यांना निलंबित करणे, सर्व रोगावर उपचार शासकीय उपजिल्हा रुग्णालयातच व्हावे, रुग्णालयातील अति दक्षता विभाग तात्काळ सुरू करणे, कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय ला लोकप्रिय बाबू हरदास एल एन नावाने नामकरण करावे, सर्व रुग्णांना लागणारा औषधोपचार हा रुग्णालयातूनच देण्यात यावा, विशेष रोगाचे विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,रुग्णांना विनाकारण रेफर टू नागपूर ‘करणाऱ्या पद्धतीवर प्रतिबंध आणावा या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली तसेच या मागण्याचे सामूहिक निवेदन नायब तहसिलदार बमनोटे यांना देण्यात आले.यावर आंदोलन काऱ्यांचे शाब्दिक समाधान करीत समस्त विषयावर बुधवारी 2 मार्च ला दुपारी 1 वाजता शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे विशेष बैठकीचे आयोजन करून सदर समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वसित करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व विजय पाटील, अनावरूल हक पटेल, विद्याताई भीमटे यांनी केले असून आंदोलनात मजहर इमाम, प्रा दुर्योधन मेश्राम, अर्चना ताई सोमकुवर,शीतल बरबटे, अफजल करिमी, मो शाहिद अजमल, तलत हकीम, शहजाद पटेल यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टी , वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय मजदूर सेना, कामठी महिला संघ कामठी चे समस्त पदाधिकारी व नागरिकगण उपस्थित होते.