मुंबई: माथेरान ( रायगड) येथील ४२८ अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आज आमदार सुनिल तटकरे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात उपस्थित केला.
दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायालयाकडे सुनावणी होवून ही ४२८ अनधिकृत बांधकामे दूर करण्याबाबत अपिलामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. माथेरान येथे गेल्या कित्येक दिवसामध्ये सदरची घरे अस्तित्वात असून माथेरानचा विकास आराखडाही अनेक वर्षापासून मंजुरीसाठी केंद्रसरकारकडे प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर हरित लवादासंदर्भातील झालेल्या निर्णयामुळे पर्यटकांचा माथेरानकडे ओढा कमी झालेला आहे.
एकूणच माथेरानचा पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयासंदर्भात फेरविचार होण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा व ४२८ अनधिकृत बांधकामांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे आमदार सुनिल तटकरे यांनी केली.