Advertisement
नागपूर : उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती केल्याशिवाय थांबू नका, असा युवकांना ओजस्वी संदेश देणा-या स्वामी विवेकानंद यांची १५६वी जयंती नागपूर महानगरपालिकेतर्फे साजरी करण्यात आली.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महापौर नंदा जिचकार यांनी अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय मनपा मुख्यालयातील सत्ता पक्ष कार्यालयातील स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी यावेळी सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक राजेश वासनिक, धनंजय तापस, प्रमोदिनी तापस, मनोज मिश्रा आदी उपस्थित होते.