नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व माजी नगरसेवक प्रशांत धवड यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेसचे घनश्याम खोबरागडे,प्रज्वल ठाकरे, अभिजीत महाकाळकर यांच्या नेतृत्वात तिरंगा चौक संगम टॉकीज, शिवनगर येथे महापौरांनी केलेली दिशाभूल व परस्पर घेतलेला निर्णया विरोधात आंदोलन तीव्र करण्यात आले.व महिलांनी आक्रमकरूप धारणकरून डिमांड कराच्या पावत्या जाळल्या 1.53 लाख घराचे सर्वेक्षण साइबरटेक कंपनीने केले हे नियमबाह्य आहे हे सिद्ध झाले. पण नागरिकांच्या खिशातून करोडो रुपये सायबरटेक कंपनीला दिले याला जबाबदार कोण?नागरिकांचा घामाचा पैसा आहे त्यांनी हा भुर्दंड का भोगावा?
याचे उत्तर मनपा प्रशासनाने द्यावे व कंपनीसोबत केलेला करार रद्द करून कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी ज्या कर धारकांनी कर रुपात पैसे भरले ते मनपा वापस करणार आहे का?ज्यांना अव्वाचे सव्वा डिमांड पाठविल्या त्यामुळे कित्येकांना अटैक आला त्याला जबाबदार कोण?असे बरेच प्रश्नांचेउत्तर मनपा प्रशासनाकडे नाही?पुर्नमूल्यांकन करण्यापूर्वी कुठलीही पूर्वसूचना न देता चुकीच्या डिमांड दिल्या नियम असा आहे की घरमालकांच्या समक्ष मूल्यांकन करून तेथेच त्यांचा आक्षेप घ्यावा लागतो पण हे डिमांड दिल्यानंतर आक्षेप मागवतात हे नियमात बसत नाही रेडिरेकनर नुसार कर आकारण्यात येवू नये चटई क्षेत्राचे मोजमाप करावे पण रेडीरेकनरनुसार सामान्य कर तर घेतात सोबतच मलजलकर, शिक्षण कर, शिक्षण अधिकार, पाणीपट्टी कर व इतर कर यावर ही रेडी रेकनरनुसार कर लावतात त्यामुळे 300 पट कर वाढला आहे झोपडपट्टीवर ही रेडीरेकनरनुसार कर लावतात पण त्यांना मनपा कुठली सुविधा देत आहे?
सर्वेक्षण करताना त्या करधारकाना ब्लूप्रिंट देणे आवश्यक असते पण आजपर्यंत कोणालाही ब्लूप्रिंट देण्यात आली नाही तसेच 1 टैक्स पावती 1 unit असते पण त्यानुसार प्रशासन जास्तीचा कर आकारु शकत नाही पण येथे उलटे करीत आहे १ टैक्स पावती व अनेक भाड़ेकरु दाखवितात व त्या भाडेकरुचे नाव अंदाजी टाकन्यात आले आहे असे आढळले काल परसस्पर घेतलेला हा निर्णय कुठलीही चर्चा न करता घेण्यात आला सभागृहात चर्चा करून निर्णय घेऊन अंमलबजावनिसाठी पाठवायला पाहिजे होता म्हणून बंटी शेळके यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले आहे घेतलेला निर्णय फसवा आहे सभागृहात सर्वासोबत चर्चा करुणच सर्व संमतिने पूर्वीप्रमानेच कर प्रणाली ठेवावी अशी मागणी नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांनी केली.
या आंदोलनात सविता खोकरे,वंदना मोहोड़,कांता ठाकरे, विजया शहाणे, प्रतिभा महाकाळकर, सोनीका महाकाळकर,आशा ठाकरे,धनश्री मोहोड़,अनुसया मोहोड़,राघोर्ते मैडम,धांडे मैडम,गलगले मैडम,मनोरमा मोहोड़,आलोक कोंडापुरवार, राजेंद्र ठाकरे, नीलेश देशभरतार, सौरभ शेळके, अक्षय घाटोले, हेमंत कातुरे, सागर चव्हाण,पूजक मदने,आशीष लोनारकर,निखिल वांढरे,सागर बैस,विजय मिश्रा,प्रतीक मोहोड़,सुयोग रणदिवे,भावेश खड्गी,हर्षल दूर्वे,नितिन गुरव,नंदू घोंगे इत्यादी उपस्थित होते.