Published On : Tue, Oct 24th, 2017

महापौर नंदा जिचकार यांनी केला कस्तुरचंद पार्कचा पाहणी दौरा


नागपूर: सर कस्तुरचंद डागा यांची १६ डिसेंबर २०१७ रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्याप्रीत्यर्थ कस्तुरचंद पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवार (ता.२३) ला कस्तुरचंद पार्कचा पाहणी दौरा केला.

यावेळी त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मंगळवारी झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, मंगळवारी झोनचे कनिष्ठ अभियंता सुरेश नंदनवार, सहायक अभियंता (विद्युत) सलीम इकबाल, कंत्राटदार समीर कायरकर, डागा परिवारातील गोविंद डागा, कौटिल्य डागा उपस्थित होते.

सर कस्तुरचंद डागा यांचे नागपूरच्या शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम संस्मरणीय ठरेल, असे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. सर कस्तुरंचद डागा यांनी शहरामध्ये आणि देशातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी व समाजासाठी मोठ्या प्रमाणात आपली मालमत्ता शासनास दान केलेली आहे. त्यातीलच एक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कस्तुरचंद पार्क आहे. कस्तुरचंद डागा यांची १६ डिसेंबर २०१७ रोजी १०० वी पुण्यतिथी आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याप्रीत्यर्थ एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन कस्तुरचंद पार्क येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. कस्तुरचंद पार्कचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तसेच पार्कलगत असलेल्या कस्तुरचंद डागा यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मैदानात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे आदेश महापौरांनी यावेळी दिले.

Advertisement