Published On : Mon, May 3rd, 2021

पावसाळयापूर्वी नदी स्वच्छता पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश

Advertisement

 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीची स्वच्छता मोहिम महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती पासून सुरु करण्यात आली आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी त्यावेळेस कोरोना बाधित असल्यामुळे अभियानाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहू शकले नाही. नुकतेच त्यांनी या स्वच्छता अभियानाची पाहणी केली आणि मनपा प्रशासनाला पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौरांनी नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदी येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. तिन्ही नदयांमध्ये दहा उपभागात नदीचे खोलीकरण व चौडीकरण करण्यात येत आहे. यासाठी महामेट्रो कडून ५, विश्वराज इंफ्रालिमिटेड, ऑरेंज सिटी वाटर, स्मार्ट सिटी, नागपूर सुधार प्रन्यास व राष्ट्रीय महामार्ग कडून प्रत्येकी एक पोकलॅन प्राप्त झाले आहे. आतापर्यंत नाग नदी मध्ये २.३६ किमी, पिवळी नदी मध्ये २.२१ किमी व पोहरा नदी मध्ये २.२ किमी पर्यंत काम झाले आहे. महापौरांनी विभागाला १५ जून पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.  कोव्हिड नियमांचे पालन करुन अभियान सुरु आहे.

यावेळी माजी सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश महाजन,  ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल, झोन सभापती प्रमिला मथरानी, नगरसेविका संगीता गि-हे, अर्चना पाठक, संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी आदी उपस्थित होते.

 

यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. सोबतच या तिनही नद्यांच्या काठावर पावसाळ्याच्या सुरूवातीला जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना झाडे लावण्याकरिता प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नद्यांचे उपभाग करण्यात आले असून यामध्ये प्रत्येकी १ उपअभियंता व १ सी.एस.ओ. लावण्यात येणार आहे. या कामाचे दायित्व अधीक्षक अभियंता मनोज तालेवार व नदी व सरोवर प्रकल्पचे सल्लागार मो.इजराईल कडे देण्यात आले आहे.

नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नाग, पिवळी व पोहरा नदीचे भाग करण्यात आले आहे.

नाग नदी

१.               अंबाझरी तलाव ते पंचशील चौक

२.               पंचशील चौक ते अशोक चौक

३.               अशोक चौक ते सेंट जेविअर स्कूल

४.               सेंट जेविअर स्कूल ते पारडी ब्रिज (भंडारा रोड)

५.               पारडी ब्रिज ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पिवळी नदी

१.               गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट

२.               मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पुलिया

३.               कामठी रोड पुलिया ते जुनी कामठी रोड पुलिया

४.               जुनी कामठी रोड पुलिया ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)

पोहरा नदी

१.               सहकार नगर ते नरेंद्र नगर पुलिया

२.               नरेंद्र नगर ते पिपळा फाटा

३.               पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगांव

Advertisement
Advertisement