Published On : Thu, Jan 2nd, 2020

पावसाळी परिस्थितीच्या पाहणीसाठी महापौरांनी गाठले ‘सिटी ऑपरेशन सेंटर’

Advertisement

पाणी साचलेल्या भागातून पाणी काढण्यासाठी दिले निर्देश

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (ता. २) सकाळपासून सुरू असलेल्या आकस्मिक आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. शहरात कुठे आपत्ती परिस्थिती तर उद्‌भवली नाही ना, याची पाहणी करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांनी सकाळीच भेट मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ गाठले. तेथून संपूर्ण शहरातील परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर चांगलाच होता. अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता बळावली होती. हे लक्षात घेऊन महापौर संदीप जोशी यांनी सकाळी १० वाजताच मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीत असलेले सिटी ऑपरेशन सेंटर गाठले.

यावेळी त्यांच्यासोबत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे राजेश दुफारे उपस्थित होते. सिटी ऑपरेशन सेंटरमधून त्यांनी शहरातील सर्व झोनमधील भागांची पाहणी केली. पावसामुळे नेहमी बाधीत होत असलेल्या भागांचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान कुठेही परिस्थिती हाताबाहेर गेले नसल्याचे त्यांना आढळले. तरीही ज्या भागात पाणी साचले आहे त्या भागातून लगेच पाणी काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.

पावसाचा जोर लक्षात घेता आणि हवामान खात्याने दिलेला अंदाज बघता महानगरपालिकेच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागरिकांच्या तक्रारी येण्याची वाट न बघता संबंधित कर्मचाऱ्यांना आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीने पोहचविण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.

Advertisement
Advertisement