Advertisement
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगनगरपालिकेच्या मुख्यालयात उद्या गुरूवारी (ता.१५) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. मनपा केंद्रीय कार्यालयातील हिरवळीवर सकाळी ८.०५ वाजता ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, नगरसेविका शिल्पा धोटे, प्रगती पाटील, नगरसेवक प्रमोद कौरती, कमलेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
राष्ट्रीय समारंभाला सर्व नगरसेवक, नगरसेविका, लोकप्रतिनिधी, मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.