Published On : Mon, Sep 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील हसनबागमध्ये एमडीची तस्करी, तिघांना अटक

Advertisement

नागपूर : नंदनवनच्या हसनबागमध्ये कारमधून एमडीची तस्करी करणाऱ्या तरुणांना गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्याकडून 64 हजार रुपयांचा एमडी जप्त करण्यात आला आहे.

हिरा हरिदास महादे (वय 29, रा. घाटे नगर), शेख उबेर शेख हबीब (33, रा. हसनबाग) आणि आकाश परसराम गाडबैल (21) अशी आरोपींची नावे आहेत. गस्तीदरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट-5 ला क्रमांक MH/34/AA/9900 कार आढळून आली पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता कारमध्ये 62 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम 42 मिली एमडी आढळून आले.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपींकडून कार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, रोख रक्कम असा चार लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कार हीरा यांच्या मालकीची आहे. उबेर हा MD हा तस्कर आहे.

तो हीरा आणि आकाशला एमडी विकत होता. हसनबाग काही काळापासून एमडी तस्करीचे केंद्र होते. येथे अनेक एमडी तस्कर बनले आहेत. हबीब बराच काळ एमडी विकत होता. एमडीची तस्करी रोखण्यात नंदनवन पोलीस अपयशी ठरत आहेत.

Advertisement