Published On : Thu, Jan 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नंदनवनमध्ये ६.५७ लाख रुपयांची एमडी पावडर जप्त;आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : गुन्हे शाखा युनिट ५ आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त करत नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६.५७ लाख रुपयांची एमडी पावडर बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक केली. बुधवारी संध्याकाळी ७:४५ ते १०:३० दरम्यान हसनबाग येथील गल्ली क्रमांक ३, कब्रिस्तानजवळ ही कारवाई करण्यात आली.

हसनबाग येथील रहिवासी मुझफ्फर अमजान अली (४८) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे ५२ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. अंमली पदार्थांसोबत पोलिसांनी ६,००० रुपयांची रोख रक्कम, एक मोबाईल फोन, एक रॉयल एनफील्ड मोटरसायकल आणि एक सुझुकी बर्गमन स्ट्रीट मोपेडही पोलिसांनी जप्त केली. आरोपीने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी बेकायदेशीर विक्रीसाठी बंदी घातलेला पदार्थ बाळगल्याची कबुली दिली.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटकेनंतर आरोपीविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी सध्या कोठडीत असून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Advertisement