मुंबई: रुपी बँकेसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित राहावे या दृष्टीने रुपी बँकेला मार्गदर्शन करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
रूपी बँकेसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन, आरबीआयचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, मुख्य महाव्यवस्थापक नीरज निगम, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यासह रूपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रूपी बँकेतील गुंतवणुकीदारांच्या ठेवी या सर्वसामान्यांच्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहण्याला प्राथम्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.