नागपूर: वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, नागपूर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दि. 28/03/2025 रोजी, वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, डोंगरगाव, नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यामध्ये डॉ. सोमदत्त करंजेकर, अध्यक्ष, वैनगंगा बहुउद्देशीय संस्था, डॉ. प्रदीप दहीकर, सल्लागार, डॉ. शिल्पा जैन, संस्थेच्या संचालिका आणि श्रीमती सुनंदा बजाज, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर हे उपस्थित होते.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये एकूण ७६३ उमेदवार जॉब फेयरला सहभागी राहिले आणि त्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ४३२ उमेदवारांना प्राथमिक शॉर्टलिस्ट केले गेले. या जॉब फेयरमध्ये ४९ प्रमुख कंपन्यांचा सहभाग होता, ज्यांनी एकूण २७२७ जागांची घोषणा केली करिता Tata Advance System, Justdial, Jayaswal Neco Industries Ltd., Geecy Apave Pvt. Ltd., Nubeno Healthcare Pvt. Ltd., Probuz Technologies Pvt. Ltd., Axis Bank सारख्या प्रख्यात ४९ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची कल्पना डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी करून या उपक्रमास एक महत्त्वाचा पाऊल मानले आहे, ज्याद्वारे कौशल्यपूर्ण उमेदवार आणि उद्योगाच्या आवश्यकतांमध्ये अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाची दिशा दिली आहे. त्यांच्या तरुणांच्या रोजगार संधींच्या उन्नतीसाठी असलेल्या समर्पणामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमात प्रा.मिथलेश पांडे, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत प्रेरित प्रशिक्षण आणि प्लेसमेंट टीमने उमेदवारांना मौल्यवान संधी प्रदान करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि उद्योग तज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी दिली.