Published On : Mon, Nov 1st, 2021
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी येथे सदस्य नोंदणी मोहीम पार पडली

Advertisement

दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालय, गणेशपेठ, नागपूर येथे मा.श्री. राजेंद्र मुळक, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री. नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.सौ. रश्मी बर्वे, अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला.

यावेळी श्री. राजेंद्र मुळक यांनी काँग्रेस पक्ष बळ कट करण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कामठी, रामटेक, सावनेर, हिंगणा, काटोल या सहाही विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणी मोहीमचा कार्यक्रम हाती घेतला. त्यांनी स्वतः काँग्रेस पक्षाचे क्रियाशील सदस्य म्हणून नोंदणी केली व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी श्री. एस.क्यू. जामा, मा.श्री. सुरेश भोयर, माजी महासचिव, श्री. मुजीब पठाण, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. शकुर नागानी, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. संजय मेश्राम, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, श्री. तापेश्वर वैद्य, सभापती कृषी, सौ. भारती पाटील, सभापती शिक्षण, सौ. नेमावली माटे, सभापती समाजकल्याण, कुंदा राऊत जि.प. सदस्य, सौ. अवन्तिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद गटनेते श्री. गंगाधर रेवतकर, श्री. रमेश जोध, श्री. साजा शफाअत अहमद, नगराध्यक्ष, न.प. कामठी, श्री. भिमराव कडू, श्री. मनोहर कुंभारे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर, श्री. तुळशिराम काळमेघ, अध्यक्ष, सेवादल, श्री बाबा आष्टनकर, श्री. अनिल राय, श्री आशिष मंडपे, एन.एस.यू.आय, श्री. असलम शेख, अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग तसेच सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद व नगर पंचायतचे नगरसेवक, सर्व तालुका अध्यक्ष नागपूर जिल्हयाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement