नागपूर: मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर द्वारे ‘शालेय रंगमंच 2023 – सत्र 1’ उपक्रमा नंतर सदर महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचे काल यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले . ज्यामध्ये 09 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नाटकाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्याबरोबरच तीन नाटकं पण तयार करण्यात आली होती. काल शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता सभागृह, दुसरा मजला, पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाला, नंगापुतला चौक, गांधीबाग, नागपूर येथे नाट्य कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेली तीन नाटके सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, नागपूर होते व श्री.राजेंद्र पुसेकर, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, नागपूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यासोबतच पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहन करणकर सर , हंसापुरी हिंदी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक श्री. कमलाकर मानमोडे सर आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘जयंती’ चित्रपटातील अभिनेता ऋतुराज वानखेडे हे देखील उपस्थित होते.
उपस्थित होते. श्री. राम जोशी सरांनी प्रेक्षकांशी संवाद साधत म्हणाले की “असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, आणि भविष्यातही असे उपक्रम होत राहिले पाहिजे ” आणि सर्व विद्यार्थ्यांना नाटकासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर नाट्यमहोत्सव – कार्यशाळेच्या संचालिका मंगला सानप यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती सांगताना, या पुढे मेराकी थिएटरतर्फे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने तीन दिवसीय “कला महोत्सव” ज्यामध्ये नाट्य सादरीकरण, बालसाहित्यावरील चर्चा सत्रे, नाट्य कार्यशाळा, तज्ज्ञांचे परिसंवाद इत्यादींचे आयोजन केले जाईल.
काल ‘ शालेय रंगमंच 2023’ च्या दुसऱ्या सत्रात डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय, प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित कृष्ण लाटा दिग्दर्शित ‘ताई’ हे नाटक सादर केले. हंसापुरी हिंदी माध्यमिक शाळे तर्फे ‘शास्त्र देखो शास्त्र’ लेखक – भारतरत्न भार्गव, दिग्दर्शिका निकिता ढाकुलकर. पन्नालाल देवडिया हिंदी मीडियम शाळेचे ‘ हड्डी ‘ हे नाटक लेखक- असगर वजाहत, दिग्दर्शन- पुष्पक भट यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतीलच विद्यार्थिनी बिनिता हिने केले. यासोबतच अश्लेश जामरे यांना मेराकी थिएटर बद्दल परिचय करून दिला. बाल कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचारी विशेष उपस्थित होते .