Published On : Fri, Mar 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

मर्सडीज चालक महिलेच्या रक्ताच्या नमुन्यात आढळले दारूचे अंश; नागपूर पोलीस गुन्ह्याच्या कलमात करणार बदल!

Advertisement

नागपूर: रामझुला येथे झालेल्या मर्सिडीज अपघातात दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला.भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने मोहम्मद हुसैन (३४) नालसाहब चौक आणि मोहम्मद आतिक (३२) रा. जाफरनगर या युवकांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तहसिल पोलिसांनी आरोपी कार चालक महिला रितीका उर्फ रितू मालू (३९) आणि माधुरी शिशिर सारडा (३७) रा. वर्धमाननगर यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविला. मात्र २४ तासांच्या आतच महिलेला जामीनही मंजूर झाला होता.

Gold Rate
Monday 20 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 91,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालूच्या वैद्यकीय अहवालात तिच्या रक्तात दारूचे अंश आढळले आहे.डीसीपी झोन 3 गोरख भामरे यांनी नागपूर टुडेशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.वैद्यकीय अहवालानंतर चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर, आम्ही आरोपी महीले विरोधात लावण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कलमात बदल करणार असल्याचे भामरे म्हणाले.

Advertisement