पुणे: पुण्यामधील पोर्षे कार अपघात प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.यया अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीरम कंपनीच्या मालकीच्या भरधाव मर्सिडीज कारने एका कुरिअर बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या अपघातामध्ये कुरिअर बॉयचा जागीच मृत्यू झाला असून कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील येरवडाच्या गोल्फ क्लब चौकात हा अपघात झाला. केदार चव्हाण (41) असे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुरिअर बॉयचं नाव आहे. तर नंजू उर्फ अर्जुन ढवळे असे कार चालकाचे नाव आहे. माहितीनुसार,पुण्यातील गोल्फ कोर्स चौकामधून दुपारी एक वाजताच्या सुमारास केदार चव्हाण दुचाकीवर जाते असताना अचानक पडले.
याचदरम्यान मागून एक मर्सिडीज बेंज आली ती सरळ त्याच्या अंगावरून गेली. यात केदार गंभीर जखमी झाला होता, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पुणे पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मृत केदारचा भाऊ चेतन चव्हाणने केला आहे.