Published On : Sat, Jul 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपचे भाडोत्री समर्थक…;देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या गजाभाऊच्या नव्या पोस्टची चर्चा

Advertisement

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला.‘एक्स’ या सोशल मीडिया हॅण्डलरवरून गजाभाऊ नावाच्या व्यक्तीने या वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गजाभाऊने एक्स’ वर एक पोस्ट शेअर करत भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

माझ्यावर एआयआर झाली अनेक भाजपभक्तांना आनंदाचे डोहाळे लागले आहेत. मी फक्त एवढंच सांगेन अशा अनेक केसेस याआधीही माझ्यावर पडल्या आहेत. त्यांने मला छटाकभर सुद्धा फरक पडला नाही आणि पडणार नाही.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मी फडणवीसचे फोटो टाकले माझ्यावर एका झटक्यात केस झाली, गेली अनेक वर्ष भाजपचे भाडोत्री समर्थक महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे फोटो मोर्फ करून टाकत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवर कारवाई केली? फडणवीसांनी लोक भाडोत्री ठेऊन शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि बाकी पुरोगामी विचारांच्या लोकांचे चारित्र्य हणण केले हे जनतेला माहीत आहे. भाजपची ही modus operandi आहे हे लोकांना माहीत आहे.

खाली screenshots टाकत आहे. आता जनता तुमची ही modus operandi तुमच्यावरच उलटवल्याशीवाय राहणार नाही. ती गोष्ट आठवते का शाळेतील राजा ‘नागवा’ फिरत असतो राजा ला वाटत आपण नवीन पोषाखात फिरतोय पण जनतेला राजा ‘नागवा’ आहे हे दिसत असताना पण कोणी बोलत नाही. मग एक मुलगा ओरडून सांगतो राजा ‘नागवा’ आहे. मी तुमच्या नेत्याचे फक्त ‘नागवेपण’ ओरडून सांगितले. आता जनता सुद्धा सांगत आहे. तुम्ही विकृतीकरण करत रहाल तर गजाभाऊ थांबत नसतो.

Advertisement
Advertisement