नागपूर : “जिथे कमी तिथे आम्ही” हा विचार नी बाळगून आर्थिक दृष्ट्या कमकुवत तसेच विपरीत परिस्थितीत मेहनत करून जिद्दीने पुढे जाण्याऱ्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभ परिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे. या सामाजिक संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संभाजी नगर,आय टी पार्क रोड, श्री दत्त मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक गव्हरमेंट आय.टी.आ. चे डेप्युटी डायरेक्टर प्रमोद ठाकरे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.आय.डी अधिकारी मनोज कुमार खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी रामेश्वर नितनवरे, सामाजिक कार्यकर्ते जयंत गुडधे पाटील, विनम्र गोयल, हर्षित गुप्ता, रोहन दुबे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद साधला पाहिजे . त्यांचे चांगले मित्र होण्याचा प्रयत्न करावा. अपेक्षेपेक्षा जास्त आशा करू नये. मुलांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या . तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गुणा सोबत चांगले सद्गुण जोडल्यास जीवन सुंदर होईल असा सल्ला मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चे वाटप करण्यात आले यामध्ये रजिस्टर,फोल्डर फाईल, पेन,प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच गरजू मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी विनोद मेहरे, देवराव पांडे, विनोद कुमार भेले, वर्षा मानकर, ज्योती नाकतोडे, संगीता पानसे, सुमन भोसले, रंजना खाडे,चंदा खंडारे प्रयत्नशील आहेत.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपस्तंभ परीवाराचे सदस्य नंदू मानकर यांनी केले.