नागपूर: महा मेट्रो फक्त मेट्रो रेल प्रकल्पाचे निर्माण करत नसून मेट्रोचे डब्बे देखील नागपुरात तयार होतील असे उद्दगार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले ते विभागीय क्रीडा संकुल येथे नागपूर महानगरपालिका द्वारे आयोजित इनोव्हेशन पर्व या कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. दीक्षित ह्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शहराचे बदलते रूप आणि त्याचे भविष्यातील होणारे फायदे सांगतांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात मेट्रो परिवहन सेवा आम्ही घडवत आहे याशिवाय मेट्रो स्थानकांवर कार चार्जिंग सिस्टम लावण्यासारखे पर्यावरण संरक्षण आणि रोजगारास संधी निर्माण करण्यासाठी नवनव्या संकल्पना आणि नव्या उद्योजकांना देखील संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे” असे प्रतिपादन यावेळी दीक्षित ह्यांनी केले.
नागपूर मेट्रोने नेहमी ‘इनोव्हेशन आणि एक्सलेंस’ला चालना दिली आहे. नागपूर मेट्रोचे नावीन्यपूर्ण कार्य हे केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श ठरत आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या जर्मनी आणि फ्रान्स सुद्धा नागपूर मेट्रोकडे ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून ‘मॉडेल’ म्हणून बघतात.
लोकसहभाग वाढविण्यासाठी मेट्रो नागरिकांच्या सोयीसाठी विविध योजना आणत आहेत. वाहतूक व्यवस्थेचे एकत्रिकरण, महाकार्ड, ग्रीन एनर्जी अशा नवनवीन संकल्पना नागपूर मेट्रो सत्यात उतरवित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महा मेट्रोचे कार्यस्थळ शेअरिंगची संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली याअंतर्गत शेअरिंग पद्धती ही कामाच्या नियोजित वेळेप्रमाणे कार्यालयाचे वापर करू शकतील.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सार्वजनिक बांधकाम,वने व आदीवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके,महापौर नंदा जिचकार,आमदार गिरीश व्यास, सुधाकर कोहळे उपस्थित होते.