नागपूर : आतापर्यंत २ मार्गिकेवर पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नागपूर मेट्रो सध्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. हिंगणा मार्गिकेवर असलेलया शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फक्त मेट्रोचाच प्रवास निवडल्यावर आता वर्धा रोडवरील मेट्रो कॉरिडॉरच्या आसपासच्या शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांची मेट्रो प्रवासाची मागणी देखील दिवसेंदिवस वाढते आहे. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना मेट्रोविषयी आणि देण्यात येणाऱ्या फीडर सेवा आणि इतर सोयी-सवलतींविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी सोमवार रोजी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये मेट्रो संवाद घेण्यात आला. अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कलासरूम मधूनच ऑनलाईन पद्धतीने हे सेशन अटेंड केले.
३५ वर्गांमध्ये प्रत्येकी ४०-५० विद्यार्थी आणि घरून ऑनलाईन असलेले काही विद्यार्थी या प्रमाणे जवळ जवळ १२०० विद्यार्थ्यांनी या मेट्रो संवादात त्यांचा सहभाग नोंदवला. महा मेट्रोच्या नागपूर कार्यालयातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्राच्या समर्पणाच्या आधी सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी महा मेट्रोचे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन डिपार्टमेंटचे संयुक्त महाव्यवस्थापक श्री महेश गुप्ता, ऑपरेशन आणि मेन्टनन्सचे प्रबंधक एस. जी. राव, पर्यावरण डिपार्टमेंटचे संयुक्त महाव्यवस्थापक प्रतिश निते ह्यावेळी उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळी उपस्थित होती.
महा मेट्रोने मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत अनेक उपाय योजना केल्या असून ज्यामध्ये मेट्रो स्थानकांवर ई- बाईक, ई – रिक्षा, इलेक्ट्रिक वाहनांन करिता चार्जिंग पॉईंट,फिडर बसची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवरील प्रत्येक मेट्रो स्थानकांवर प्रवाश्यानकरिता सायकल ठेवण्यात आल्या असून या सायकलींना नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मेट्रो स्थानकांवर ठेवण्यात आलेल्या सायकल या माय-बाईक व व्हीआयपीएल कंपनीच्या आहेत. या सर्व सायकल ऍप बेस्ड असून नागरिक सहज पणे सायकल मेट्रो स्थानकावरून घेऊ शकतात. मेट्रोचा प्रवास होताच मेट्रो स्थानकावरून सायकल घेत आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत या सायकलचा उपयोग करता येऊ शकतो तसेच या सायकल आपण महिन्याभराकरिता देखील प्राप्त करू शकतात. मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल्या सायकल प्रतिदिन,आठवडा तसेच एक महिन्याकरिता उपलब्ध आहे. २ रु. प्रति तास ते ४७९/५९९ रु. प्रति महिना या दराने उपल्बध आहे.
मुख्य म्हणजे मेट्रो स्थानकावर नागरिक, शाळा व कॉलेज येथील मुले प्रतिदिन मेट्रो ने प्रवास करीत आहे व मेट्रोचा प्रवास पूर्ण झाल्यावर मेट्रो स्टेशन येथून सायकलचा उपयोग करीत आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून सकाळी ६.३० वाजता पासून ते रात्री ९. ३० वाजता पर्यंत मेट्रो सेवा सुरु आहे.