नवी दिल्ली: मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्समध्ये मंगळवारी (11 मार्च) पुन्हा एकदा जगभरात मोठ्या प्रमाणात बिघाडाचा सामना करत आहे. हजारो यूजर ट्विटर वापरू शकत नाहीत. गेल्या 24 तासांत X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) बंद पडण्याची ही चौथी वेळ आहे. यूजरकडून संताप व्यक्त होत करण्यात येत आहे.
सायबर हल्ल्याचा ठरला बळी?
काल एका दिवसातून तीन वेळा X डाऊन झालं. ज्यामुळे जगभरातील यूजर्संना समस्या निर्माण झाल्या. दरम्यान स्पेसएक्स आणि एक्सचे मालक एलोन मस्क यांनी दावा केला आहे की प्लॅटफॉर्म ‘मोठ्या सायबर हल्ल्याचा’ बळी ठरला आहे.
दरम्यान सोमवारी जगभरात ‘X’ एका दिवसात तीन वेळा डाऊन झालं. त्यामुळे X ची सेवा पूर्णपणे थांबली. त्यामुळे यूजर्संना लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. पहिल्यांदाच दुपारी 3:30 वाजता X डाऊन झाले, ज्यामुळे यूजर्संना अर्धा तास लॉग इन करण्यात अडचणी आल्या. यानंतर ते संध्याकाळी 7 वाजल्यापासून आणखी एक तास बंद राहिले आणि नंतर रात्री 8.30 वाजता पुन्हा बंद झाले.