नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन घोणस जातीचा विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली.
यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विदर्भ सर्पमित्र समिती सदस्य अमित वंजारी यांना याबाबत माहिती दिली.
सर्पमित्र अमित वंजारी, आकाश मेश्राम,अविनाश लोहकरे हे घटनास्थळी पोहोचले. तिघांनीही सापाला अती दक्षतेने पकडून सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
या सापाला रसेल वायपर असेही म्हणतात. हा अतिशय विषारी आहे.