नागपूर: आज जीवनाचे प्रत्येक क्षेत्र धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव, नैराश्य इत्यादी आणि त्यामुळे होणारी सामाजिक गुंतागुंत देखील वाढली आहे. यासाठीच म्हणून अपेक्स समूहाने आपल्या नव्या उपक्रमाअंतर्गत करंडे ज्वेलर्स, पहिला माळा,धरमपेठ येथे “माईंड एन माईन समुपदेशन” केंद्र सुरु केले आहे. दिनांक २२ मे २०१८ रोजी प्रसिद्ध समाजसेवक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या सहधर्मचारिणी डॉ. मंदा आमटे यांनी या समुपदेशन केंद्राचे उदघाटन केले.
माईंड एन माईन हे मनोचिकित्सक आणि समुपदेशकांचे पॉलिक्लिनिक असून येथे व्यत्क्तिगत, वैवाहिक, नातेसंबंध,पालकत्व, किशोरवयीन, करियर, औद्योगिक व व्यावसायिक अश्या सर्व क्षेत्रांसाठी एकाच छताखाली समुपदेशन सेवा देण्यात आली आहे.
व्यावसायिक समुपदेशकांनी पुरस्कृत केलेल्या सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीचे पालन ह्या केंद्रात करण्यात येईल. त्याचप्रमाणे ‘माईंड स्पा- ऍक्टिव्हिटी क्लब’ हि सेवा देखील येथे उपलब्ध असेल. याअंतर्गत विविध वयोगटांसाठी एक सहायक गट असेल आणि वयपरत्वे त्यांच्या समस्यांशी संबंधित उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
आध्यात्मिक मनोचिकित्सक डॉ. प्रबोध हे ‘माईंड एन माईन’चे संचालक असतील. तर बहुआयामी उद्योजक किरीट ठक्कर आणि पल्लवी ठक्कर, एचआर तज्ञ आणि समुपदेशक यांच्याकडे देखील नेतृत्वाची धुरा असेल. केंद्राच्या सल्लागार समूहात प्रसिद्ध मनोचिकित्सक व सल्लागार डॉ. सपना शर्मा, पुन्नम मनेरीया, अनुष्का करीरा आणि डॉ. प्रफुल गोरेगावकर, भगवान कारगावकर, डॉ. चेतन रेवतकर, देवयानी जोशी, डॉ. के. डी. देशपांडे, नेहा साहू, विनीत कौर आणि डॉ. यशश्री मराठे यांचा समावेश आहे.
—Swapnil Bhogekar