मुंबई: केंद्रीय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या हुनर हाटचे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार आशिष शेलार, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे उपस्थित होते.
इस्लाम जिमखाना येथे 4 ते 10 जानेवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पारंपरिक हस्तकला करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हुनर हाट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हातमाग, हस्तकला, हस्त-भरतकाम यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच छोट्या-छोट्या खेड्यांतील गरजू मात्र कलेने समृद्ध अशा लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावे या उद्देशातून हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचसोबत बदलत्या काळात लोप पावत चाललेली भारताची ही अद्वितीय कला टिकवून ठेवण्याचा हुनर हाट मधून प्रयत्न आहे.