नागपूर : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहूल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संस्थांनी 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
अल्पसंख्यांक विकास विभागाकडून जिल्हयातील अल्पसंख्यांक बहूल शिक्षण संस्थांना या आर्थिक वर्षासाठी अनुदान राबविण्यात येणार आहे त्यासाठी ऐच्छिक अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांनी अनुदानाच्या लाभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेकडे दिनांक 18 सप्टेंबर 2017 पूर्वी प्रस्ताव सादर करावे, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.
मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान 18 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत असून मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी दिनांक 18 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राज्यात राबविण्यात येत असून ही योजना या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसायांनी दिनांक 18 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावे. यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचार घेतले जाणार नाही. मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी कळविले आहे.