Published On : Tue, Jun 9th, 2020

नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात ‘मिशन बिगीन अगेन’

एमआयडीसीत 43 हजार कामगार रुजू
2189 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

नागपूर: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या उद्योगांचे शटर डाऊन करण्यात आले होते. तथापि चौथ्या लॉकडाऊनमध्ये खबरदारी घेत टप्याटप्याने एक एक क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील लहान मोठे उद्योग सुरू झाले आहेत. नागपूर ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील 2179 उद्योग घटकात उत्पादन सुरू झाले असून सद्यास्थितीत 43 हजार 10 कामगार रुजू झाले आहेत.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लॉकडाऊनच्या दुसऱ्या चरणात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील 2702 उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यास ऑनलाईन परवानगी देण्यात आली. त्यापैकी 5 जून 2020 पर्यंत 2179 उद्योग घटकांत उत्पादन सुरू झाले आहे. परवानगी प्राप्त करून उत्पादन सुरू झालेल्या उद्योगांमध्ये 43 हजार 10 कामगार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

परवानगी घेऊन उत्पादन सुरू झालेल्या मोठ्या उद्योगांमध्ये एमआयडीसी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा, आर.सी. प्लास्टो, बजाज स्टील, एमआयडीसी कळमेश्वर मधील जेएसडब्लू स्टील, बुटीबोरी एमआयडीसीतील सनविजय रोलींग मिल्स, केईसी इंटरनॅशनल, सिएट टायर्स, शिल्पा स्टील, मोरारजी टेक्सटाईल्स, दिनशॅ फुडस, मौदा येथील हिंदाल्को व विसाका इंडस्ट्रिज, बाजारगांव येथील सोलर एक्सप्लोसीव, सुर्यलक्ष्मी स्पीनिंग मिल्स नगरधन, रामटेक व निर्मल टेक्सआईल्स कोंढाळीचा समावेश आहे.

कोविड -19 विषाणू संसर्गामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. लॉकडाऊन अंतर्गत प्रथम चरणात साईस मिल, दाल मिल,अन्न प्रक्रीया उद्योग, औषध निर्मिती, खत व बियाणे प्रक्रीया इत्यादी अत्यावश्यक उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात 230 उद्योगात उत्पादन सुरू आहे.

सद्यास्थितीत नागपूर महानगर पालिका क्षेत्र वगळता कोठेही उद्योग सुरू करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. महापालिका क्षेत्रात फक्त अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादनास परवानगी दिली जाते. महापालिका क्षेत्रातील उप्पलवाडी औद्योगिक सहकारी वसाहत, माँ उमिया सहकारी औद्योगिक वसाहत, वांजरा व स्मॉल एरिया क्षेत्रातील इतर उद्योगात उत्पादनास परवानगी नाही.

स्थानिकांना रोजगार
कोविड -19 विषाणू संसर्गामुळे औद्योगिक व इतर व्यवसायिक आस्थापनामध्ये काम करणारे परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात परत गेल्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावायासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहिम राबवित आहे. कौशल्या विकास विभागाच्या पोर्टलवर उद्योग घटकांनी नोंदणी करण्यात आली असून त्यांना आवश्यक असणाऱ्या कामगारांची मागणी त्या ठिकाणी नोंदविली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची टिम तयार करण्यात आली आहे. ही टिम प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देऊन त्यांची मागणी पोर्टलवर नोंदवित आहे.

Advertisement