Published On : Tue, Apr 18th, 2017

सचिन तेंडुलकर कबुतर; बच्चू कडूंची जीभ घसरली

Advertisement

अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, त्यांनी कुठे आत्महत्या केली?, या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार बच्चू कडू यांची जीभ पुन्हा घसरली आहे. अहमदनगरमधील आसूड यात्रेत शेतकऱ्यांचे हाल पोटतिडकीने मांडताना, ते अचानक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर घसरले आणि त्यांनी या ‘भारतरत्ना’ची कबुतर म्हणून संभावना केली.

‘सचिन तेंडुलकरचे रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत. पण या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यभर पायपीट करणाऱ्या माऊलीचे, शेतकऱ्यांचे रन मोजायला कुणीच नाही, याचं दुःख आहे. सचिन तेंडुलकरचे रन मोजू नका. ते कबुतर मेलं काय, राहिलं काय, नको काढू रन साल्या. आपलं काय वाट्याने चाललंय इथे’, अशा अत्यंत कडवट्ट शब्दांत बच्चू कडू यांनी आपला राग व्यक्त केला. ‘इथून चौका आणि तिथून छक्का कुणालाही मारता येईल. पण याला एवढं डोक्यावर घेतलंय, असं वाटतंय की पाकिस्तान जिंकून आलंय’, असंही त्यांनी सुनावलं.

हेमा मालिनी रोज दारू पितात – बच्चू कडू

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या व्यथा-वेदना बच्चू कडू सातत्याने मांडत असतात. त्यासाठी आगळीवेगळी आंदोलनंही ते करतात, सरकारवर प्रहार करतात. पण, हा हल्ला करताना हेमा मालिनी यांना विनाकारण लक्ष्य केल्यानं त्यांच्यावरच टीका झाली होती. त्यानंतर आता, सचिनसारख्या विक्रमवीराचा अगदीच पातळी सोडून अपमान केल्यानं ते पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

… As Published in मटा ऑनलाइन

Advertisement
Advertisement