Published On : Thu, Aug 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

आमदार बच्चू कडू यांनी केली अधिकाऱ्याला मारहाण; छत्रपती संभाजीनगरातील घटना

MLA Bachu Kadu

छत्रपती संभाजीनगर: दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लावल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्या इ-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे केली.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होतं. मात्र कंपनीने माहिती नसलेल्या एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले.तसेच त्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल कडू यांनी अधिकाऱ्याला केला.

या घटनेसंदर्भात कडू यांनी स्पष्टीकरण देत योजनेतून जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आले, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचे ते म्हणाले. कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता, अशी माहितीही त्यांनी दिली.या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घेत याबाबत चौकशीची मागणीही त्यांनी केली.

Advertisement