नागपूर : शिवसेनेतील दोन्ही गटात सत्तासंघर्षाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार अपात्रतेवरुन सुनावणी सुरू आहे. विधीमंडळातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे.
दरम्यान निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आमदाराच्या अपात्रतेच्या संदर्भात १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजतानंतर निकाल जाहीर होईल. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
विधीमंडळाचे हे निकाल असणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही सविस्तर निकालाची प्रत बहाल करण्यात येईल.यादरम्यान निकालातील ठळक मुद्दे यावेळी वाचले जाणार आहेत.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत दिली होती. ती मुदत पुन्हा वाढवून देण्यात आली. आता हा निकाल काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.