देवेंद्र फडणवीस यांनी गुढी उभारून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
नागपूर : आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्या प्रकरणी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व भाजपा प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्यासह नऊ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. सर्व नऊही जणांवरील गुन्हे मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
कोरोना महामारी दरम्यान १५ जून २०२१ रोजी नंदनवन पोलिस्ट स्टेशनमध्ये आमदार कृष्णा खोपडे, अॅड. धर्मपाल मेश्राम, मनीषा कोठे, समिता चकोले, अशोक देशमुख, देवेंद्र काटोलकर, बाळा विटाळकर, विनोद कुंटे, नंदा येवले यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्या. व्ही.एम. देशपांडे आणि अमित बोरकर यांच्या द्विसदस्यीय बेंच पुढे प्रकरण सुनावणीसाठी आले. दोन्ही न्यायाधीशद्वयांच्या बेंचने नऊही जणांवरील गुन्हे रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. धर्मपाल मेश्राम यांचेकडून अॅड. आर.के. माहेश्वरी यांनी न्यायालयात बाजू मांडली. सरकारच्या वतीने अॅडिशनल पब्लिक प्रॉसिक्यूटर टी.ए. मिर्झा यांनी काम पाहिले.