संशयित कोरोनाबाधीतांना हटवण्याचे जिल्हाधिकारयांनी दिले आश्वासन
.
हिंगणा: नागपूर शहरात विलगिकरण कक्षात असलेल्या १२६ संशयित कोरोनाबाधीत , वानाडोंगरी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या सर्व नागरिकांना वानाडोंगरी येथून इतरत्र हलविण्यात यावे , यांसाठी परिसरातील नागरिकांच्या मागणीवर भाजप व राष्ट्रवादी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने दिलीत.
आ.समीर मेघे यांचे नेतृत्त्वात वानाडोंगरीच्या नगराध्यक्ष वर्षा सतीश शहाकार , उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता , सभापती बाळु मोरे , जि प सदस्य राजेंद्र हरडे, अर्चना कैलाश गिरी, माजी जि प सदस्य अंबादास उके,नितीन काळे यांनी निवेदन दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जि.प. सदस्य दिनेश बंग , महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे , सुचिता विनोद ठाकरे , सभापती बबनराव आव्हाले , तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे , विनोद ठाकरे यांनीही निवेदन दिले . तसेच सकाळी जिल्हाधिकारी व पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून , सतरंजीपुरा येथील कारंटाईन करण्यासाठी ठेवलेल्या, १२६ संशयितांना विनाविलंब समाजकल्याण होस्टेलमधुन इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी लावून धरली.
न.प. वानाडोंगरी परिसर दाट लोकवस्तीचा आहे. तसेच या होस्टेलमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे . संशयितांना येथे ठेवल्यामुळे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .शिवाय या परिसरात नागरिकांमध्य भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट लोकवस्ती व कामगारांच्या मोठ्या झोपडपट्टी या भागात आहेत त्यामुळे या लोकांना येथून इतरत्र हलविण्यात यावे आशा मागणीचे निवेदन देण्यात आले
ं आ. समीर मेघे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर , समाधान न झाल्याने , झाडाखाली कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले . शिवाय जोपर्यंत त्या लोकांना इतरत्र हलविण्यात येणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोरून उठणार नाही अशी भूमिका घेतली काही वेळातच याची दखल घेत जिल्हाधिकारी महोदयांनी आज सायं पर्यंत त्यामुळे त्या स़ंशयिताना आज च्या आज हलवण्याचे आश्र्वासन जिल्हाधिकारी यांचेकडून मिळाले असल्याची माहिती आ मेघे यांनी प्रसार माध्यमांना दिली. आता त्या लोकांना येथून कधी इतरत्र हलविण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे