स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५४ व्या आत्मार्पण स्मृती दिना निमित्त शंकर नगर चैक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेविका श्रीमती उज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सर्वश्री चन्द्रकांत लाखे, मिलीन्द कानडे, शिरीष दामले, अजय कुलकर्णी, विष्णू देशपांडे, प्रमोद सातंगे, ज्ञानेश्वर गायकवाड, महादेवराव बाजीराव, अजय आचार्य, प्रा. प्रमोद सोवनी, हिंदु महासभेचे रणजीत जोशी, अभिजीत जोशी, अक्षय वाघ, आशीष मुडे, अनंत पाध्ये व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
चंद्रशेखर आजाद शहीद दिन दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी
शहीद चंद्रशेखर आजाद यांच्या शहीद दिना निमित्त सेंट्रल एव्हेन्यू रोड स्थित चंद्रशेखर आजाद यांच्या प्रतिमेला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे हे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.00 वाजता पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करतील.